आजम खान यांनी चक्क चोरल्या म्हशी !


लखनऊ – आता म्हशीच्या चोरल्याचा गुन्हा समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली शहरातील दोन व्यक्तींनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशच्या कोतवाली शहरातील एका व्यक्तीच्या दोन म्हशी आणि दुसऱ्या व्यक्तीची एक म्हैस, अशा एकूण तीन म्हशी काही लोकांनी गौशाळेत नेण्यासाठी म्हणून नेल्या. तक्रारदार व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, आजम खान यांचे ते समर्थक होते. म्हशींना आजम खान यांच्याच गोशाळेमध्ये नेले जात असल्याचे त्यांनी सांगितले होते.

या व्यक्तींनी त्यामुळे आजम खान यांच्यासह सहा कार्यकर्ते आणि २० ते ३० अज्ञात लोकांविरोधात पोलीस ठाण्यात म्हशी चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा कलम ५०४, ५०६, ४२७, ३९५, ४४८ आणि कलम ४९२ अशा कलमांअंतर्गत नोंदवण्यात आला आहे. याआधीही भूमाफिया असल्याचा तसेच पुस्तक चोर असल्याचे गुन्हे आजम खान यांच्यावर दाखल झाले आहेत.

Leave a Comment