कर्नाटकमध्ये चक्क नारळापासून बनवली 30 फूट उंच गणेश मूर्ती


आपल्या देशात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण या गणेशोत्सव दरम्यान बसवण्यात येणाऱ्या गणेश मुर्त्यांमुळे पर्यावरणाचे देखील नुकसान होत असल्याच्या बातम्या आपण याआधी देखील ऐकल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटकातील जेपी नगरमधील सत्य गणपती मंदिरात गणेशोत्सव हा पर्यावरणाला हानीकारक ठरणार नाही या हेतूने नारळापासून 30 फूट उंच गणेश मूर्ती तयार केली आहे.


तब्बल 9 हजार नारळ आणि 3 हजार कच्च्या नारळांचा वापर इको फ्रेंडली गणपतीसाठी करण्यात आला आहे. मूर्तीची स्थापना सत्य गणपती शिर्डी साई ट्रस्ट ऑफ पुट्टेनहल्लीच्या माध्यमातून केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी या संस्थेकडून नव्या प्रकारे गणेश मूर्ती तयार केली जाते. यावर्षी नारळापासून गणेश मूर्ती तयार करण्याचे ठरवण्यात आले. गेल्यावर्षी संस्थेने ऊसापासून 30 फूट उंच मूर्ती तयार केली होती.


पर्यावरणाविषयी आज आपण अधिक सजग झाले पाहिजे. आपले प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे होणे आवश्यक आहे. अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव सुध्दा पर्यावरणपूरकच असायला हवा, कारण पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन आपल्याला गणेशोत्सव साजरा करता येईल.

Leave a Comment