VIDEO – टोल प्लाझावर पैशांची मागणी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण


गेल्या अनेक महिन्यांपासून टोल प्लाझावर होणाऱ्या मारहाणीच्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील वेळी गुडगाव येथील टोल प्लाझावर कार चालकाकडे पैशांची मागणी कर्मचार्‍याला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर कार चालक फरार झाला.

आता अशीच आणखी एक बातमी गुडगावमधूनच समोर आली आहे. टोल न भरता प्लाझा ओलांडण्यापासून रोखताना एका महिला कर्मचाऱ्यासह एका व्यक्तीने गैरवर्तन केले. त्या बदल्यात बाईंनीही त्या पुरुषाचे थोबाड देखील रंगवले.

ही घटना खेरकी धौला टोल प्लाझा येथे घडली असून या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्या पुरुषास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्हिडिओमध्ये, टोल घेणारी महिला बूथच्या आत तीन इतर पुरुष सहकाऱ्यांसमवेत होती तर टोल प्लाझावरील इतर लोकांनी आणि कर्मचाऱ्यांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.


एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, त्या व्यक्तीने टोल प्लाझाच्या महिला कर्मचार्‍याशी भांडण केले होते आणि या संदर्भात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. आरोपीचा शोध लागला असून घटनेच्या दोन तासांतच त्याला अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment