अक्षयने रिलीज केले तापसीच्या रश्मी रॉकेटचे मोशन पोस्टर


अक्षय कुमार सोबत मिशन मंगलमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणारी तापसी पन्नू आता आपल्या नव्या मिशनसाठी सज्ज झाली आहे. तापसीच्या या मोहिमेची पहिली झलक अक्षय कुमारने दाखविली आहे. तथापि, या नव्या मोहिमेमध्ये तापसी रॉकेटसारखे उड्डाण करणार नाही, तर धावणार आहे.


तापसीचे हे नवीन अभियान म्हणजे रश्मी रॉकेट, ज्याचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या मोशन पोस्टरवर अक्षय कुमारने लिहिले – रॉकेट ट्रॅकवरील पुढील मोहिमेसाठी ती सज्ज आहे. रश्मी रॉकेटमधील तापसीच्या व्यक्तिरेखेची झलक. या चित्रपटातील तापसीच्या पात्राचे नाव रश्मी असून तिच्या धावण्याच्या वेगामुळे तिला रश्मी रॉकेट असे संबोधले गेले आहे.


तापसीने देखील या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले असून या पात्राच्या व्यक्तिरेखेविषयी तिने लिहिले आहे की ती हट्टी आणि निर्भय आहे. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.

रश्मी रॉकेट ही गुजरातच्या कच्छ भागातील अतिशय वेगवान धावणारी मुलगी रश्मीची कहाणी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश खुराना यांनी केले आहे. यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त तापसीने ट्विटद्वारे अनेक फोटो शेअर करुन आपल्या पात्राची ओळख करून दिली होती. तापसीचा लूक आणि गेटअप कच्छ परिसरातील ग्रामीण मुलींसारखा आहे.


तापसीने आपल्या ताकतीवर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक मजबूत असे स्थान निर्माण केले आहे. यंदा तिचा बदला आणि त्यानंतर मिशन मंगल हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. हरियाणाच्या नेमबाज दादीची बायोपिक सांड की आँख नावाच्या आणखी एका स्पोर्ट्स चित्रपटात तापसी दिसणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर तिच्यासमवेत झळकणार आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment