क्रिकेटच्या देवाची वरुण धवन, अभिषेक बच्चनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो यामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत गली क्रिकेट खेळताना दिसक आहे. त्याने यावेळी वरुण धवन आणि अभिषेक बच्चनच्या गोलंदाजीवर दमदार फटकेबाजी केली. यावेळी सचिनने कामासोबतच खेळालाही महत्व दिले पाहिजे, असे म्हटले आहे.


वरुण धवन आणि अभिषेक बच्चन दोघेही सचिनची विकेट घेण्याचा प्रयत्न करताना सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतात. पण अगदी सावधगिरीने त्यांच्या चेंडुंवर सचिन फटकेबाजी करताना दिसतो. याबद्दल वरुणने त्याची प्रशंसाही केली आहे.


२९ ऑगस्ट रोजी फिट इंडिया अभियानाद्वारे नागरिकांना फिट राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. या अभियानाला सचिन तेंडुलकरनेही समर्थन दिले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment