
नुकताच आपला ३९वा वाढदिवस अभिनेत्री नेहा धुपियाने साजरा केला. आपला पती अंगद बेदीसोबत नेहा सध्या मालदीवमध्ये आपली सुट्टी सेलिब्रेट करत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झाला नेहा धुपियाचा बोल्ड अवतार
२७ ऑगस्टला अभिनेत्री नेहा धुपिया हिने वयाची ३९ वर्ष पूर्ण केली. ती तिच्या पतीसोबत सध्या मालदीवमध्ये वाढदिवस साजरा करत आहे. नेहाने आतापर्यंत आपले अनेक हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
नेहा धुपियाला बुद्धी आणि सौंदर्य यांचे योग्य उदाहरण म्हणून ओळखले जाते. मिस इंडिया २००२चे विजेतेपद पटकावून जिने ते सिद्ध देखील केले होते. तसेच मिस युनिवर्सच्या टॉप १० फायनलिस्टमध्ये देखील ती सामील होती.
अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या अभिनेता अंगद बेदीसोबत नेहाने १० मे २०१८ रोजी लग्न केले होते. त्यानंतर तिने नोव्हेंबरमध्ये एका गोड मुलीला जन्म दिला होता. तिच्या मुलीचे नाव मेहर असे आहे.
आतापर्यंत हिंदी, पंजाबी, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटात नेहाने काम केले आहे. कयामत या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
त्याचबरोबर या बोल्ड अँड ब्यूटीफूल अभिनेत्रीने जपानी चित्रपट नत्तू ओडोरुमध्ये देखील काम केले होते. २००२ साली तिचा हा चित्रपट रिलीज झाला होता.
