तुमच्या फोनमध्ये असलेले हे लोकप्रिय अॅप त्वरित करा डिलीट


आपल्या मधील अनेक जण कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी स्कॅनर अ‍ॅपचा वापर करतात. स्कॅनरसाठी सर्वात प्रसिध्द कॅमस्कॅनर हे अ‍ॅप आहे. कॅमस्कॅनर अ‍ॅप एवढे प्रसिध्द आहे की, आतापर्यंत या अ‍ॅपला 10 करोड पेक्षा अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलेले आहे. मात्र आता याच लोकप्रिय अ‍ॅपच्या सिक्युरिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

सिक्युरिटी फर्म Kaspersky लॅब्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कॅमस्कॅनर  अ‍ॅपमध्ये मालवेअर (वायरस) आहे. मात्र रिपोर्टमध्ये हे देखील सांगण्यात आले आहे की, कॅमस्कॅनर हे कोणतेही मालवेअर अ‍ॅप नाही, तसेच त्यामुळे कोणतेही वायरस असणारा अ‍ॅप इंस्टॉल केला जात नाही.

कंपनी जाहीरातदारांना इन-अ‍ॅप परचेंज हा पर्याय दिला होता, यामध्ये आतापर्यंत कोणतीच अडचण निर्माण झाली नाही. मात्र कॅमस्कॅनरच्या नवीन वर्जनमध्ये मालवेअर मॉड्युल Trojan-Dropper.AndroidOS.Necro.n दिसून आले आहे.

हे मालवेअर तुमच्या फोनमध्ये वायरस असणारे अ‍ॅप डाउनलोड करू शकतो. तसेच जाहीरातींद्वारे पैसे देखील मागितले जाऊ शकतात. हा रिपोर्ट समोर आल्यानंतर देखील अद्याप गुगलने प्ले स्टोरमधून हा अ‍ॅप काढलेला नाही.

गुगलने काही दिवसांपुर्वीच अ‍ॅप पब्लिशिंग पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, कोणताही डेव्हलपर अ‍ॅप त्वरित पब्लिश करू शकत नाही. गुगलने यासाठी एप्रुवल वेळ निश्चित केली आहे.

Leave a Comment