आपल्या आगामी चित्रपटातील लूक रणदीपने केला शेअर


लवकरच ‘रात ऑन अ हाईवे’ चित्रपटातून अभिनेता रणदीप हुड्डा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो एका अशा अॅडव्हर्टाइझिंग प्रोफेशनलची भूमिका या आगामी चित्रपटात साकारणार आहे, जो आपल्या आयुष्यातील ४८ तासांआधी घडलेल्या घटना विसरतो. रणदीपने नुकताच या थ्रिलरमधील आपला फर्स्ट लूक शेअर केला आहे.


आपल्या ट्विटर अकाऊंटवर रणदीपने शेअर केलेल्या या फोटोत त्याच्या डोक्याला मार लागल्याचे पाहायला मिळत आहे. विवेक चौहान रात ऑन अ हाईवेचे दिग्दर्शन करत आहेत, तर याची निर्मिती मोहन नादार यांची असणार आहे. रणदीप वगळता या चित्रपटाची इतर स्टारकास्ट युनायटेड किंगडममधील असणार आहे.

या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण हे रात्रीच्या वेळी केले जाणार आहे. २४ दिवसांत रणदीप हुड्डाचे शेड्यूल पूर्ण होणार असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी भाषेत रिलीज होणार आहे. दरम्यान इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटाचे रणदीपने नुकतेच चित्रीकरण पूर्ण केले आहे. यात सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Leave a Comment