असा आहे जान्हवीचा ‘कारगिल गर्ल’ लूक


बॉलिवूडमध्ये ‘धडक’ चित्रपटाद्वारे पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरला प्रचंड लोकप्रियता पहिल्याच चित्रपटातून मिळाली. जान्हवीने या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अनेक नवे चित्रपट साईन केले आहेत. ती गेल्या काही दिवसांपासून आपल्या रूही अफ्झा आणि कारगिल गर्लसारख्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.


आता जान्हवीचा ‘कारगिल गर्ल’ चित्रपटातील लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. तिचा फर्स्ट लूक चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श ट्विट करत रिलीज केले आहे.

कारगिल युद्धात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या पहिल्या लढवैय्या महिला वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार असून यात गुंजन यांची भूमिका जान्हवी साकारणार आहे. या चित्रपटात गुंजनच्या भावाची भूमिका करताना अंगद बेदी दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी गुंजनच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

Leave a Comment