‘या’ दिवशी रिलीज होणार ‘झोया फॅक्टर’चा ट्रेलर


आगामी ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूर झळकणार आहे. ती वेगळ्या भूमिकेत या चित्रपटात दिसेल. चित्रपटाच्या टीझरमध्येही ती ‘लकी चार्म’ असलेली पाहायला मिळाली. काल या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार होता. मात्र, ट्रेलरची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सोनमच्या ‘झोया फॅक्टर’साठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.


पंकज धीर हे ४१ सेकंदाच्या टीझरमध्ये लकी चार्म म्हणून जोया कवच विकताना दिसतात. यात चांगल्या नशीबासाठी हे कवच विक्री करण्याच्या अनेक जाहिराती पाहायला मिळतात. सोनमचा क्रिकेटच्या देवीच्या लूकमधील फोटो या कवचमध्ये पाहायला मिळतो. या चित्रपटाचा ट्रेलर आता उद्या रिलीज करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिली आहे. सोनमनेही हा टीझर शेअर करत याला कॅप्शन दिले आहे. माझ्या यशस्वी होण्यामागे काही रहस्य नाही. ही सगळी तर जोया कवचची जादू आहे, असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. दरम्यान या चित्रपटात सलमान दुलकरही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.

Leave a Comment