अँटिग्वा – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३१८ धावांनी विजय मिळवत टेस्ट चॅम्पियनशिपचा विजयी शुभारंभ केला आहे. भारतीय संघ या विजयानंतर आयसीसीच्या कसोटी टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. कर्णधार विराट कोहली आणि खेळाडू दणदणीत विजयानंतर खास कॅरेबियन व्दीपावर संध्याकाळी क्रुजवर बसून मस्ती करताना दिसले.
व्हायरल : विराट सेना उपभोगत आहे क्रुझचा आनंद
Endless blues 🌊💙 pic.twitter.com/WigHnr7e5b
— K L Rahul (@klrahul11) August 27, 2019
संघातील खेळाडूसोबत क्रुझवर मस्ती करतानाचा एक फोटो केएल राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन शेअर केला आहे. विराट कोहली त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत त्यामध्ये दिसत आहे. राहुलने शेअर केलेल्या फोटोमध्ये विराट कोहली, अनुष्का शर्मा, केएल राहूल, मयंक अग्रवाल, आर. अश्विन दिसत आहे. हे सगळे फोटो काढताना आनंद व्यक्त करत असताना दिसत आहेत.
दरम्यान, वेस्ट इंडीज विरुध्दचा पहिला सामना भारतीय संघाने ३१८ धावांनी जिंकला आहे. या मालिकेतील शेवटचा दुसरा कसोटी सामना ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. हा सामना जमैका येथील सबिना पार्क मैदानावर रंगणार आहे.