या गाण्यात पहा श्रद्धा-प्रभासची लव्ह केमेस्ट्री


येत्या शुक्रवारी प्रभास आणि श्रद्धा कपूरचा आगामी आणि बहुप्रतिक्षीत ‘साहो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. प्रेक्षकांमध्ये देखील या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. चाहत्यांवर या चित्रपटाच्या फर्स्ट लूक पासून ते ट्रेलरपर्यंत सर्वच गोष्टींनी छाप पाडली आहे. श्रद्धा आणि प्रभासची लव्ह केमेस्ट्री देखील भरपूर अॅक्शनचा भरणा असलेला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटातील नवे कोरे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

यापूर्वी प्रभास आणि श्रद्धाची लव्ह केमेस्ट्री ‘इन्नी सोनी’ गाण्यातही पाहायला मिळाली होती. आता ‘बेबी वॉन्ट यू टेल मी’ या गाण्यातही त्याचा रोमान्स पाहायला मिळतो. गाण्यामध्ये दोघांमधील प्रेमाची सुरूवात चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

सुजीत यांनी बिग बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या ‘साहो’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषेतही रिलीज होणार आहे. जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे नील नितिन मुकेश, अशी तगडी स्टारकास्टही चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment