बॉलिवूडच्या भाईजानचे रानू मंडल यांना स्पेशल गिफ्ट?


बॉलिवूड अभिनेता, संगीतकार आणि निर्माता हिमेश रेशमियाने आपल्या आगामी चित्रपटात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून रातोरात गायिका झालेल्या रानू मंडल यांना गाण्याची संधी दिली. नुकताच या गाण्याच्या रेकॉर्डींगचा व्हिडीओ हिमेशने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला. हिमेशने जवळपास सहा ते सात लाख रुपयांचे मानधन या एका गाण्यासाठी मंडल यांना दिले आहे. आता बॉलिवूडचा भाईजान देखील रानू यांच्या मदतीला धावून आला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्यामुळे रानू या रेल्वे स्थानकांवर गाणे गाऊन तेथेचे आपले जीवन व्यतीत करीत होत्या. रानू यांना देखील नेहमी अनेकांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या सलमान खानने मदत केली आहे. डोक्यावर छत नसणाऱ्या रानू यांना सलमानने ५५ लाखांचे घर भेट म्हणून दिले असल्याचे म्हटले जात आहे. पण या गोष्टीचा खुलासा सलमानकडून अद्याप झालेला नाही. रानू यांच्या सुरेल आणि मधूर आवाजाने सलमानचे मन जिंकले असल्यामुळे रानू यांना त्याने घर भेट म्हणून दिले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.

Leave a Comment