आनंद महिंद्रांनी इम्रान खान यांच्या ज्ञानावरुन घेतली शाळा


आपल्या देशातील आघाडीच्या उद्योगपतींमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांची देखील गणती होते. तेच आनंद महिंद्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांशी कायम संपर्कात असतात आणि विविध विषयांवर भाष्य अथवा मत व्यक्त करत असतात. त्यातच आता त्यांनी नशीब माझे की इतिहास किंवा भूगोल शिकवायला मला इम्रान खान नव्हते यासाठी मी देवाचा खूप आभारी असल्याचे मत आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर नोंदवले आहे.


त्यांनी इम्रान खान यांचा एक व्हिडिओही या ट्विटमध्ये पोस्ट केला आहे. इम्रान खान यांनी या व्हिडिओमध्ये इतिहासाचा चुकीचा दाखला देण्याबरोबरच जगाचा भूगोलही बदलला आहे. महिंद्रा यांनी यावरुनच इम्रान यांच्यावर निशाणा साधला आहे.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० केंद्रातील मोदी सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. भारताने सर्वच देशांना ठामपणे कलम ३७० रद्द करणे भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे इम्रान खान सरकारने अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रयत्न करुनही पाकिस्तानला या प्रकरणामध्ये कोणत्याही देशाने थेट पाठिंबा दिलेला नाही. भारताबरोबरच सर्व व्यापारी संबंध पाकिस्तानने तडका फडकी रद्द केले आहेत. याचा सर्वात जास्त फटका भारतापेक्षा पाकिस्तानलाच बसत आहे. असे असले तरी इम्रान खान सरकारकडून भारतावर टीका केली जात आहे. मात्र आता या टीकेमधील तर्कशुद्धपणा हरवत चालल्याचे नुकत्याच व्हायरल झालेल्या एक व्हिडिओमधून समोर आले आहे.


दरम्यान पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रबानी यांनी देखील इम्रान खान यांच्या ज्ञानाचे धिंधावडे काढले आहेत. त्यांनी देखील इम्रान खान यांचा वेडेपण पाकिस्तानच्या संसदेत निदर्शनास आणून दिला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचे पंतप्रधान अशा प्रकारची वक्तव्य करुन आपल्या देशाचे हसू करु घेत आहेत. तसेच पाकिस्तानची प्रतिमा डागळण्यात त्यांची मोलाची भूमिका असल्याचे वक्तव्य रबानी केले आहे.

Leave a Comment