बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या महागड्या कार


आपल्यापैकी अनेकांना बॉलीवूड सेलिब्रेटींच्या लाईफस्टाईल जाणून घेण्याबाबत उत्सुकता लागून राहिलेल्या असता. ते काय खातात, त्याचबरोबर ते कोणते कपडे घालतात, त्यांचे अफेअर, ब्रेकअप याचाही त्यात हमखास समावेश असतोच. त्यातच आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील कलाकारांच्या आलिशान गाड्यांबद्दल सांगणार आहोत.

27 ऑगस्ट 2019 रोजी सोनम कपूरला तिच्या ब्रँड न्यू मर्सिडिजसह मुंबईत डान्स क्लासच्या बाहेर स्पॉट केले होते.

कॅटरिना कैफ ऑडी सिरीजची मोठी फॅन आहे. झिरोच्या या अभिनेत्रीने आता परिपूर्ण वाहनासाठी तिचा शोध व्यापक केला आहे आणि एक नवीन रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे.

रितेश देशमुखने त्याची पत्नी जेनेलिया डिसूझाला 2017 मध्ये तिच्या वाढदिवशी टेस्ला एसयूव्ही, मॉडेल एक्स भेट म्हणून दिली होती. अभिनेत्याने आनंदात एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यांनी लिहिले होते की “So the Baiko @geneliad surely knows how to make a 40 yr old birthday boy feel like a 20 yr Old.

2016 साली बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने आपल्या आलिशान कारच्या ताफ्यात नवीन पांढरी लक्झरी कार दाखल केली. ही एक बीएमडब्ल्यू आय 8 होती आणि त्याची किंमत सुमारे 3.3 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. बीएमडब्ल्यू आय 8 एक लक्झरी हायब्रीड कार आहे, जी इलेक्ट्रिकली तसेच इंधनावरही धावते. ही दोन-दाराचे चार-सीटर आहे आणि फक्त 4.4 सेकंदात ही कार 0 किमी प्रति तासापासून 100 किमी प्रतितास वेगाने जाऊ शकते.

२०१२ मध्ये इम्रान खान आणि त्याची पूर्व पत्नी अवंतिकाची लाल रंगाची फेरारी चर्चेचा विषय बनली होती. मागच्या टोकाला असणारी नंबरप्लेट गायब होती. शहरातील वाढत्या खड्ड्यांमुळे नेटिझन्सना प्रश्न पडला की नंबर प्लेट वाटेतच पडली आहे का?

2018 मध्ये जॉन अब्राहमची लॅम्बोर्गिनी गॅलार्डो चर्चेत आली होती, त्याने ही कार करण जोहरकडून खरेदी केली होती.

Leave a Comment