खाकीत प्री वेडिंग शूट करणाऱ्या पोलिसाविरोधात तक्रार दाखल


लग्नाआधी प्री वेडिंग शूट अनेकजण करत असतात. मात्र हेच प्री वेंडिंग फोटोशूट अनेकदा अडचणीचे देखील ठरते. असेच काहीसे राजस्थानमधील एका पोलिस कर्मचाऱ्याबरोबर झाले आहे. उदयपूरच्या कोठडा पोलिस स्टेशनचे एसआय धनपत सिंह यांनी पोलिस वर्दीमध्ये फोटोशूट केला. यादरम्यान त्यांनी भावी पत्नीकडून 500 रूपये देखील घेतले. यानंतर त्यांचाच बॅचमेट एसआय आणि मंडफिया स्टेशनचे अधिकाऱ्यांने त्यांच्या विरोधात लाच घेतल्याची तक्रार दाखल केली आहे.

या घटनेनंतर आयजी हवासिंह म्हणाले की, हे लाजीरवाणे आहे. गणवेशात फोटोशूट करण्यावर बंदी घातली पाहिजे असे ते म्हणाले. तसेच त्यांना या प्रकरणात कारवाई केली पाहिजे असेही म्हटले आहे.

या प्रकरणावर धनपत सिंह म्हणाले की, विभागाकडून जो काही आदेश येईल, त्याचे पालन करेल. धनपत यांचे मागील महिन्यातच लग्न झाले आहे. प्री वेडिंग फोटोशूट हा लग्नाच्या एक महिन्या आधीचा आहे.

या प्री वेडिंग शूटच्या व्हिडीओमध्ये एक युवती (धनपत यांची पत्नी) विना हॅलमेट घालून गाडी चालवत येते यावेळी धनपतबरोबर असलेले पोलिस कर्मचारी तिला थांबवतात. हे पोलिस कर्मचारी त्या युवतीला विचारण्यास सुरूवात करतात त्यावेळी ती धनपत यांच्या खिश्यात 500 रूपये ठेवते. हेच पैसे लाच घेतले असल्याचे सांगत, तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

आयजी हवा सिंह यांनी हे दुर्भाग्यपुर्ण असल्याचे म्हटले असून, यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर नकारात्मक प्रभाव पडतो. ते म्हणाले की, लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमात गणवेशात असे शूट करण्यावर बंदी घातली पाहिजे.

Leave a Comment