आयसीसीने केला सचिन तेंडुलकरचा ‘अपमान’, चाहत्यांनी असा व्यक्त केला संताप


नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर यासंदर्भात केलेले एक ट्विट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आयसीसीने असे काहीतरी करण्याची ही पहिली वेळ नाही, त्यांनी विश्वचषक स्पर्धेदरम्यान केलेल्या चुकांची पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली आहे.


आयसीसीने इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्सची तुलना सचिनशी केली, ज्याने अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात विजयी शतक झळकावले. स्टोक्सचे वर्णन सचिनसारखे अलीकडच्या काळातील महान क्रिकेटर असे करण्यात आले होते.


आयसीसीने मंगळवारी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान केलेले एक ट्विट पुन्हा शेअर करत लिहिले आहे की, आम्ही आधीच असे म्हटले होते. ट्विटमध्ये सचिन आणि बेन स्टोक्स एकत्र दिसले आहेत आणि त्यांनी सर्वकालिक महान क्रिकेटपटू बेन स्टोक्स आणि सचिन तेंडुलकर लिहिले आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर हे ट्विट केले गेले होते.


आयसीसीच्या या कृतीचा चाहत्यांना प्रचंड राग आला आहे. एका चाहत्याने लिहिले, आपण फक्त म्हणता आहात म्हणून आम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही. सचिन हा आतापर्यंतचा महान क्रिकेटपटू होता, आहे आणि कायमच राहणार त्यात कोणतीही शंका नाही.


सचिन आणि स्टोक्सची आकडेवारी लिहिताना एका चाहत्याने आयसीसीला सांगितले की कोणत्या आधारे या दोघांची तुम्ही तुलना केली आहे. तर एका चाहत्याने लिहिले की, सचिनच जास्त मान देण्यास पात्र आहे.

Leave a Comment