केवळ 131 रूपयांच्या लॉटरीद्वारे तिने जिंकले करोडो रूपये


कोणत्या क्षणी एखाद्याचे नशीब बदलेल काही सांगता येत नाही. असेच काहीसे कॅनेडाच्या एका महिलेबरोबर झाले आहे. दोन मुलांची आई असलेल्या विक्की मिशेलने 131 रूपयांच्या लॉटरीन तब्बल 31 करोड 55 लाख रूपये जिंकले आहेत. ही रक्कम तिला दर महिन्याला 8 लाख 80 हजार अशा हप्त्याद्वारे मिळणार आहे. 42 वर्षीय मिशेलने जेव्हा ही लॉटरी खरेदी केली, त्यावेळी तिच्या खात्यात केवळ 131 रूपये होते.

मिशेल ही कॅनेडाच्या हालीफॅक्स येथे राहते. ती सांगते की, आतापर्यंत आम्ही एका साध्या घरात आयुष्य घालवले. आता एका चांगल्या घरात राहायला जाणार आहोत. मिशेल एका अकाउंटिग फर्ममध्ये प्रशासकीय सहाय्यक म्हणून कार्य करते. ती सांगते की, तुम्हाला कधीच वाटत नसते की, तुम्ही एवढी मोठी गोष्ट जिंकला. मात्र जेव्हा असे होते, त्यावेळी तुमचे संपुर्ण आयुष्यच बदलते.

मिशेल सांगते की, ती अनेकवेळा लॉटरी खरेदी करत असते. काही दिवसांपुर्वीच तिने 10 पाउंड जिंकले होते. या 10 पाउंडद्वारे तिने वेगवेगळ्या डॉची आणखी तिकिटे खरेदी केली. मागील आठवड्यात तिच्याकडे केवळ 131 रूपये होते व अखेर तिला लॉटरी लागली. ड्रॉच्या दिवशी ती सकाळी मुलगा कामावर गेला की नाही हे बघण्यासाठी उठली होती, त्याचवेळी तिला नॅशनल लॉटरीकडून ईमेल आला.

ती सांगते की, मला वाटले छोटी-मोठी रक्कम असेल. मी ईमेल चेक केला तेव्हा मला समजले की, पुढील तीस वर्ष प्रत्येक महिन्याला 10 हजार पाउंड मिळणार आहेत. मी माझा नवरा एडमला मी लॉटरी जिंकल्याचे सांगितल्यावर त्याने यावेळी एक पाउंड जिंकलीस का ?, असे तो म्हणाला.

तिने सांगितले की, आधी मुलांसाठी कोणतीही वस्तू घेण्याआधी विचार करावा लागत असे. मात्र आता त्यांच्यासाठी सर्व गोष्टी घेईल. मी माझी नोकरी कायम ठेवेल, मात्र आता आयुष्य एकदम सोपे झाले आहे.

Leave a Comment