Video : रन आउटच्या नादात यष्टिरक्षकाने गोलंदाजावरच भिरकावला चेंडू


क्रिकेटच्या मैदानात अनेकवेळा अशा विचित्र घटना घडतात की, ते बघून आपण आपले हसू रोखू शकत नाही. अशीच एक घटना नॉर्थ ग्रुप विटलिटी ब्लास्ट टी 20 स्पर्धेमधील डरहम आणि यॉर्कशायर यांच्या सामन्यात पाहायला मिळाली.

टी20 ब्लास्टच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, यॉर्कशायरचा विकेटकिपर जॉनथन टॅटर्सलने केलेला थ्रो जोरात त्याच्याच संघातील केशव महाराजला लागतो.

डरहम संघाची फलंदाजी चालू असताना एका फलंदाजाने महाराजच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. बॉल फलंदाजाच्या पॅडला लागला आणि गोलंदाजाने लगेच अपील केली. मात्र अंपायरने नॉट आउट दिले. याचदरम्यान फलंदाज धावा काढण्यासाठी पळत होते. यावेळी विकेटकिपर जोनथनने रन आउट करण्यासाठी केलेला थ्रो थेट स्टंपावर लागण्याऐवजी केशव महाराजला लागला.

बॉल लागल्यानंतरही केशव महाराजने आपल्या चार ओव्हर पुर्ण केल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. यॉर्कशायरने डरहमसमोर 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र यॉर्कशायरच्या जॅक शूटने 5 विकेट्स घेत संघाला 14 धावांनी विजय मिळवून दिला.

Leave a Comment