भाजपचा हा आंबटशौकिन नेता झाला कर्नाटकचा उपमुख्यमंत्री


अखेर एक आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर कर्नाटकमध्ये मंत्रीपदाचे वाटप करण्यात आले. यंदा येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळामध्ये तीन उपमुख्यमंत्री आहेत. यामधील एक उपमुख्यमंत्री भाजपचा तेच नेते आहेत, जे विधानसभेत पोर्न बघत असताना सापडले होते. भाजपच्या या नेत्याचे नाव लक्ष्मण सावदी असून, ते विधानसभेत पोर्न बघत असताना सापडले होते. नविन कॅबिनेटमध्ये त्यांना ट्रांसपोर्ट पोर्टफोलिया देण्यात आला आहे.

असे असले तरीही, भाजपचे आमदार एमपी रेनुकाचार्यने लक्ष्मण यांच्या नियुक्तीला विरोध केला आहे. ते म्हणाले की, लक्ष्मण सावदी यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे, तरी देखील त्यांना मंत्रीपद देण्यात आले. सावदी हे महेश कुमाटटल्ली यांच्याविरूध्द निवडणूक हरले आहेत.

तसेच, लक्ष्मण सावदी म्हणाले की, केंद्र आणि राज्याच्या नेत्यांनी मला उपमुख्यमंत्री बनवले आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. आमचे सरकार चांगले काम करेल. मी हे पद मागितले नव्हते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हे पद दिले आहे, ते मी स्विकारतो.

2012 मध्ये कर्नाटक राज्य विधानसभेत सावदी हे पोर्न बघताना सापडले होते. यामुळे भाजपची मोठी नाचक्की झाली होती. सावदी यांनी त्यावेळी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, ते शिक्षणाच्या उद्देशाने ते बघत होते, जेणेकरून रेव पार्टीबद्दल माहिती मिळू शकेल. या घटनेनंतर सावदी, सीसी पाटील आणि कृष्णा पालेमरने मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Leave a Comment