केवळ एक रुपयात मिळणार ‘सुविधा’ सॅनिटरी पॅड


आजपासून म्हणजेच 27 ऑगस्टपासून केवळ 1 रुपयात महिलांना तसेच मुलींना मासिक पाळीत वापरण्यात येणारे सॅनिटरी पॅड उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे सॅनिटरी पॅड सरकारी जनऔषधी केंद्रांमध्ये उपलब्ध होतील अशी माहिती रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. हा निर्णय महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि हितावह असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हे पॅड्स आधी अडीच रुपयांना सरकारी जनऔषधी केंद्रांमध्ये प्रत्येकी एक अशा किंमतीत मिळत होते. देशभरातील 5500 जन औषधी केंद्रांमध्ये ‘सुविधा’ या नावाने हे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध असतील, असे मांडवीय म्हणाले. तसेच मोदी सरकारच्या काळातील सॅनिटरी पॅड्स बाबतीतील हा निर्णय महत्वपुर्ण निर्णय असल्याचेही ते म्हणाले.

पूर्वीच्या काळी महिलांना दर महिन्याला येणा-या मासिक पाळीमध्ये महिला कपडा वापरायच्या. त्यांच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी हे घातक होते. म्हणून सॅनिटरी पॅड्स ही नवीन संकल्पना राबविण्यात आली. पण गोरगरीबांना याची किंमत ही परवडण्यासाठी नसल्यामुळे आजही अनेक महिला किंवा मुली कपडा वापरतात. त्यामुळे सामाजिकतेचे भान ठेवून महिलांसाठी काय फायद्याचे आहेत हे लक्षात घेऊन हा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment