५ दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार धनंजय महाडिक


कोल्हापूर – काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेश सुरू आहे. आता भाजपमध्ये कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून राष्ट्रवादीचे काही प्रमुख कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

धनंजय महाडिक भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. सोलापूरमधील ३१ ऑगस्टच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमात महाडिक प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. पण मोदी यांचा सोलापूर दौरा निश्चित नाही. तरीही येत्या ५ दिवसात महाडिक भाजप प्रवेश करणार आहेत.

महाडिक यांच्यासोबत भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील जवळपास 50 प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे काही प्रमुख कार्यकर्ते, ताराराणी आघाडीचे नगरसेवक, जिल्हापरिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य त्याचबरोबर गोकुळ दूध संस्थेचे आणि कारखान्याचे संचालक यांच्यासह कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे.

महाडिक यांच्या भाजपप्रवेशानंतर जिल्ह्यातील भाजपची ताकद नक्कीच वाढणार आहे. धनंजय महाडिक हे सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते मुंबईला गेले आहेत. त्यांच्या भेटीनंतर या प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.

Leave a Comment