दोन एटीएम व्यवहारात ठेवावे लागू शकते सहा ते 12 तासांचे अंतर


प्रत्यक्ष बँकेत जाऊन केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शहर, गाव, परिसरात एटीएम वाढल्यापासून बरीच मर्यादा आली. तात्काळ पैसे लोकांना उपलब्ध होऊ लागल्यामुळे बँक शाखेत लावावी लागणारी रांग, त्यातून खर्च होणारा वेळ वाचला. पण, या सर्व घडामोडींमध्ये एटीएमच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीचे प्रमाणही बरेच वाढले. दिल्ली, स्टेट लेवल बँकर्स कमिटीने या प्रकारांना आळा घालण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल सूचवले आहेत.

जर बँकांनी हे बदल स्वीकारले तर एटीएमच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारीला चाप बसू शकणार आहे. आपल्या बदलात एसएलबीसीने म्हटले आहे की, सहा ते 12 तासांच्या कालावधीत एटीएममधून केले जाणारे व्यवहार (ट्रांजेक्शन) हे असायला हवे. म्हणजे एटीएममधून 6 ते 12 तासांच्या कालावधीत केवळ एकच वेळ पैसे काढता येऊ शकतात. एसएलबीसी द्वारा सूचविण्यात आलेले बदल स्वीकारून अद्याप ते लागू करण्यात आले नाहीत. पण, यावर जवळपास 18 बँकेंच्या प्रतिनिधींच्या बैठकीत विस्तृत चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, या शिवाय इतरही काही पर्याय बँकांनी सूचवले आहेत. अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी यात खातेधारकांना सावध करण्यासाठी ओटीपी पाठवला जाऊ शकतो. याशिवाय अतिरिक्त एटीएमसाठी सेंट्रलाइजस्ड मॉनिटरिंग सिस्टम उभारण्याचाही पर्याय देण्यात आला आहे. सेंट्रलाइजस्ड मॉनिटरिंग सिस्टम ओबीसी बँक, भारतीय स्टेट बँक, पीएनबी, आईडीबीआई बँक आणि केनरा बँक यांच्याकडे ही सूविधा अगोदरपासूनच लागू आहे.,

Leave a Comment