आयुष्मान आणि यामीच्या आगामी ‘बाला’चा टीझर रिलीज


अभिनेता आयुष्मान खुराणा आणि यामी गौतम ही जोडी बाला या आगामी चित्रपटात दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. तर या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात भूमी पेडणेकरही मुख्य भूमिकेत झळकणार असून भूमी पेडणेकरचा आयुष्मानसोबतचा हा तिचा तिसरा चित्रपट असणार आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता आयुष्मानच्या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाचा आता ‘बाला’चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. आयुष्मान नेहमीप्रमाणेचे या चित्रपटातूनही वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे टीझरमधून कळते.


आयुष्मान चित्रपटात युवावस्थेत टक्कल पडलेल्या एका तरुणाची भूमिका साकारणार आहे. तो टीझरच्या सुरुवातीलाच दुचाकीवर बसून एक प्रेम गीत म्हणत चाललेला असल्याचे दिसते. पण काही वेळातच हवेने त्याच्या डोक्यातील टोपी उडून जाते आणि यानंतर युवावस्थेत पडलेल्या टक्कलमुळे प्रेमाची सगळी स्वप्न चूर झालेला आयुष्मान ‘रहने दो छोडो, हम ना करेंगे प्यार’ हे गाणे गाताना दिसतो. हा चित्रपट विनोदी असणार असल्याचे टीझरवरुनच लक्षात येते.

हा चित्रपट नोव्हेंबरच्या २२ तारखेला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले असून दिनेश विजन यांची निर्मिती आहे. या त्रिकूटाशिवाय चित्रपटात सौरभ शुक्ला, जावेद जाफरी आणि सीमा पहवा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment