पहिल्या गाण्यासाठी रानू मंडल यांना मिळाले एवढे मानधन


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात स्टार होणाऱ्या व्यक्तींच्या यादीत आता रेल्वे स्टेशनवर गाणे गाणाऱ्या रानू मंडल यांच्या नावाचा समावेश झाला असून सोशल मीडियावर रेल्वे स्थानकावर गाणे गाणाऱ्या रानू यांच्या मधूर आवाजातील गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना बॉलिवूड अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे. या रेकॉर्डिंगच्या व्हिडिओही व्हायरल झाला आहे. पण या एका गाण्यासाठी मंडल यांना हिमेश दिलेल्या मानधनाचा आकडाही आता समोर आला आहे. तो वाचूनही तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.

लवकरच हिमेश रेशमियाचा ‘हॅप्पी हार्डी अॅन्ड हीर’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. रानू मंडल यांनी या चित्रपटासाठी ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले आहे. हिमेशनेच इन्स्टाग्रामवर हे गाणे रेकॉर्ड करताचा रानूचा व्हिडीओ शेअर केला. रानू या व्हिडीओमध्ये हिमेशसह उभी राहून गाणे गात असल्याचे दिसत आहे.

एका वृत्तानुसार रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये रानू यांनी गायलेल्या पहिल्यावहिल्या गाण्यासाठी त्यांना हिमेशने जवळपास सहा ते सात लाख रुपये मानधन दिले आहे. पण हिमेशने देऊ केलेले मानधन हे रानू स्वीकार करत नव्हत्या. पण त्यांना हिमेशने अगदी आग्रहाने हे पैसे दिले. त्याचबरोबर हिमेशने त्यांना तुम्ही बॉलिवूडमध्ये नक्की यशस्वी होणार असेही सांगितले. बॉलिवूडमध्ये स्टार होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नसल्याचे म्हणत हिमेशने त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

Leave a Comment