अरे देव्वा! चक्क ८३ वर्षांच्या ‘आजोबाशी’ २७ वर्षीय तरूणीने केले लग्न


असे म्हणतात ना शिक्षणाला आणि प्रेमाला कोणतेही बंधन किंवा अट नसते. पण प्रेम ही सर्वसामान्यपणे सम वयस्क किंवा थोडे फार अंतर असलेल्या लोकांमध्ये होते. त्यातच आता या प्रेमाची इंडोनेशियामधील एक अनोखी कहाणी समोर आली आहे. तब्बल ८३ वर्षांच्या व्यक्तीसोबत तेथील एका २७ वर्षीय तरूणीने लग्न केले आणि दोघेही याला पहिल्या नजरेचे प्रेम सांगत आहेत.

त्याचबरोबर या तरूणीने ज्या ८३ वर्षाच्या व्यक्तीसोबत लग्न केले त्या व्यक्तीच्या मोठ्या मुलाचे वय ५१ वर्षे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तरूणीच्या वडिलांचे वय देखील या मुलाच्या वयापेक्षा कमी आहे. नूरेनी नावाची ही तरूणी तिच्या वडिलांच्या वयापेक्षा कमी वयाच्या मुलाची सावत्र आई झाली आहे.

यासंदर्भात mothership.sg या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार काही कामासाठी ८३ वर्षीय नवरदेव सुर्दीगोकडे २७ वर्षी नूरेनी गेली होती. त्या दोघांची ही पहिली भेट होती. नरेनीने सांगितले की, पहिल्या नजरेतच आम्हाला प्रेम जडले. त्यानंतर आम्ही काहींना काही कारण शोधत भेटत राहिलो. सुदीर्गो म्हणजे नवरदेवाला ८ नातवंडे आहेत. त्यामुळे हे प्रेम समजून घेणे अर्थातच इतरांसाठी जरा अवघड आहे.

सुर्दीगोने सांगितले की, आता वयाच्या अशा टप्प्यावर मी आहे, जिथे मला रोमॅंटिक रिलेशन असे वाटत नाही. पण नूरेनी मला भेटल्यावर मला प्रेमाची जाणीव झाल्यामुळे तिच्याकडे मी प्रेम व्यक्त केले आणि लग्नासाठी विचारणा केली. तिनेही लग्नाला लगेच होकार दिला. नूरेनीच्या घरातूनही या लग्नासाठी परवानगी होती. पण सुदीर्गोच्या मुलांना याबाबत थोडी चिंता होती. नूरेनीने एका स्थानिक वेबसाइटला सांगितले की, माझ्या पतीच्या मुलांनी मला अनेकदा हा प्रश्न विचारला की, तू तुझ्या समवयस्क व्यक्तीसोबत का लग्न करत नाही?.

सुदीर्गोची मुलगी टार्टीने प्रसारमाध्यमांना सांगितले की, नूरेनीसोबत मी स्वत: बोलले आणि तिने मला स्पष्ट सांगितले की, माझ्या वडिलांवर तिचे प्रेम आहे. त्यांचे प्रेम बघून आम्हीही या लग्नाला होकार दिला. यात आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे नूरेनीचे हे पहिलेच लग्न आहे तर सुदीर्गोची याआधी तीन लग्ने झाली आहेत.

Leave a Comment