या फेसमास्कची किंमत ऐकलीत?


चेहरा फ्रेश दिसावा, चेहऱ्याचा थकवा कमी व्हावा यासाठी अनेक प्रकारचे मास्क वापरले जातात. बाजारात अगदी १५ रुपयांपासून असे मास्क किंवा पॅक उपलब्ध आहेत. ब्युटी प्रोडक्ट्स बनविणाऱ्या जगप्रसिद्ध 111 स्कीन कंपनीने नुकतेच त्यांचे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. त्याची किंमत ऐकून चेहरा आपोआपच पांढराफटक पडू शकेल. हा नवा फेसमास्क चक्क १ लाख ७० हजार रुपये किमतीचा आहे. ब्लॅक डायमंड फेस मास्क सिएना मिलर नावाच्या महिलेने बनविला असून ती मेकअप आर्टिस्ट आहे. हा मास्क घातलेले तिचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

111 स्कीन या कंपनीची उत्पादने नेहमीच लोकांच्या पसंतीला उतरली आहेत. यापूर्वीही अनेक सेलेब्रिटीनी या कंपनीच्या फेसमास्क सह त्यांचे फोटो सोशलमिडियावर शेअर केले आहेत. काही दिवसापूर्वी कंपनीने बाजारात आणलेल्या ब्लॅक डायमंड आय मास्कची किंमत १९ हजार रुपये आहे. आता याच नावाने कंपनीने फेस मास्क बाजारात आणला आहे. अर्थात हा मास्क अतिश्रीमंत, सेलेब्रिटीच वापरू शकतील असे वाटत असेल तर तो भ्रम आहे. हा मास्क बाजारात येताच लोकप्रिय बनला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री किम कर्दीशीयन या कंपनीच्या उत्पादनांची चाहती आहे असेही समजते.

Leave a Comment