जेटली यांच्या अंत्यसंस्कारावेळी चोरांची हातसफाई


माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर रविवारी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होत असताना झालेल्या प्रचंड गर्दीत चोरांची चांदी झाली आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी किमान ११ जणांचे मोबाईल हातोहात लांबविल्याचे समजते. चोरांनी यावेळी भाजप खासदार बाबुल सुप्रियो आणि पतंजलीचे प्रवक्ते एस. के. तिजरीवाला यानाही हात दाखविला आहे.

या संदर्भात सुप्रियो यांनी ट्विट करून चोरट्यांनी ११ जणांचे मोबाईल पळविल्याचे सांगितले असून ६ खासदारांनाही चोरट्यांनी हात दाखविल्याचे म्हटले आहे. सुप्रियो यांनी चोरट्याचा हात धरण्याचा पर्यंत केला पण गर्दीचा फायदा घेऊन तो निसटून गेल्याचे म्हटले आहे तर एस.के. तिजरीवाला यांनी चोरट्यांनी किमान ३५ जणांचे मोबाईल लांबविल्याचे म्हटले आहे. तिजरीवाल यांनी त्यांचा फोन करवलनगर येथे दिसत असल्याचा स्क्रीन शॉट प्रसिद्ध केला असून चोरट्यांना पकडू शकत असाल तर पकदा असे आवाहन केले आहे. पोलीस अधिकारयांनी या संदर्भात ज्यांनी फोन चोरीला गेल्याचा तक्रारी दिल्या आहेत त्या नोंदवून घेतल्या गेल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment