या पठ्ठ्याने दुसऱ्यांदा शोधली इन्स्टाग्रामच्या सुरक्षेमधील त्रुटी


चेन्नई – सोशल मीडियात अग्रेसर असलेल्या फेसबुककडून वापरकर्त्याचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असतानाच त्यातील सुरक्षा त्रुटी शोधून काढणाऱ्याला कंपनीकडून रोख बक्षीस देण्यात येते. इन्स्टाग्राममधील सुरक्षा त्रुटी दुसऱ्यांदा चेन्नईमधील सुरक्षा संशोधक लक्ष्मण मुथियाह यांनी शोधून काढली आहे. त्यांना यावेळी ७ लाख (१० हजार डॉलर) रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

इन्स्टाग्राममधील सुरक्षा त्रुटी शोधून दाखविल्याबद्दल यापूर्वी लक्ष्मण मुथियाह यांना इन्स्टाग्रामची मालकी असलेल्या फेसबुकने २१ लाख (३० हजार डॉलर) दिले होते. त्यांनी काढलेली दुसरी त्रुटी ही पहिल्या त्रुटीप्रमाणेच आहे. जुलैमध्ये इन्स्टाग्राम वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही अकाउंट हॅक करता येत असल्याचे लक्ष्मण यांनी दाखवून दिले होते. फेसबुकने ही त्रुटी दूर केली आहे. त्रुटी शोधून काढल्याबद्दल ७ लाख रुपये कंपनीने दिल्याचे लक्ष्मण यांनी सांगितले.

त्यांनी इन्स्टाग्रामच्या सर्व्हरकडून वापरकर्त्याचा पासवर्ड रिसेट करता येतो हे दाखविले होते. वेगवेगळ्या वापरकर्त्याचे पासवर्ड त्यासाठी वापरूनही त्यांनी दाखविले होते. अशा प्रकारामुळे इन्स्ट्राग्रामचे अकाउंट हॅक होते, हे त्यामधून दिसून आले. फेसबुकने त्यांना पत्र लिहून त्यांच्या कामगिरीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे.

Leave a Comment