ही व्यक्ती ठरली स्टेशनवर गाणा-या ‘रानू दी’साठी ‘देवदूत’


अवघ्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियात एकाच रात्रीत स्टार झालेल्या रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणा-या रानू दी अर्थात रानू मंडाल यांचे आयुष्य एकाच क्षणात बदलले. रानू मंडाल या रस्त्यावरून थेट बॉलिवूडच्या स्टुडिओपर्यंत पोहोचल्या. त्यांनी बॉलिवूडचा रॉकस्टार हिमेश रेशमिया याच्या चित्रपटासाठी पहिले गाणे रेकॉर्ड केले. त्यांच्या एका व्हिडीओने ही सगळी किमया साधली.

त्यांचा रस्त्यावर गातांनाचा व्हिडीओ एका व्यक्तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो व्हायरल झाला आणि त्यांच्या नशीबाने कलाटणी घेतली. रानू या सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करणा-या त्या व्यक्तिला कधीच विसरू शकणार नाही. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यात ‘देवदूत’ बनून आलेल्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. तर एतींद्र चक्रवर्ती असे त्या व्यक्तिचे नाव आहे.

पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर रानू गाणी गात स्वत:च पोट भरत असे. तिच्या मधूर आवाजाने अनेकजण मंत्रमुग्ध होत. तिचे कौतुक करत काहीजण तर तिच्या हातात चार-दोन रूपये देऊन पुढे चालते होत. पण एक दिवस रस्त्यावर गाणाऱ्या रानूला गाताना एतींद्र चक्रवर्तीने बघितले आणि तिचा गातानाचा व्हिडीओ घेतला. लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा’ हे गाणे रानू गात होत्या. एतींद्रने तिचा व्हिडीओ बनवला आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. तो एवढा व्हायरल झाला की, रानू यांचे आयुष्य या व्हिडीओने बदलले.

रानू यांचा हा व्हिडीओ पाहून बॉलिवूडमधून तिला गाण्याच्या आॅफर्स यायला लागल्या. रानू यांना पहिली संधी हिमेश रेशमिया याने दिली. बॉलिवूड स्टुडिओत रानू यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले, एतींद्र सुद्धा त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होता. रानूला ही संधी दिल्याबद्दल एतींद्रने हिमेशचे आभार मानले. एतींद्र हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि रानाघाटमध्येच राहतो.

Leave a Comment