हैदराबादच्या 12 वर्षीय विद्यार्थ्याने बनवले स्मार्ट डस्टबिन


एक स्मार्ट डस्टबिन हैदराबादच्या 12 वर्षांच्या मोहम्मद हसनने बनवले असून विशेष म्हणजे ते डस्टबिन कचऱ्याने पूर्ण भरल्यावर रिकामी करण्यासाठी अलर्ट पाठवते. हे डस्टबिन वाय-फायद्वारा कनेक्ट केले जाऊ शकते. या डस्टबिनबाबत हसनने सांगितल्याप्रमाणे, स्वच्छ भारत अभियानाशी निगडित एक व्हिडीओ पाहात असताना त्याला ही आयडिया सुचली.

हसननुसार, डस्टबिनमध्ये लागलेले अल्ट्रासॉनिक सेंसर कचरा किती भरला हे कळवतात. याचे विश्लेषण केल्यानंतर सेंसर डस्टबिनमध्ये लागलेल्या एलसीडीमध्ये माहिती पाठवतात. कचरा जेव्हा भरला जातो तेव्हा वाय-फायने कनेक्ट असल्यामुळे डस्टबिन सरळ महानगरपालिकेला कचरा उचलण्यासाठी संदेश पाठवते. वाय-फायने जोडण्याबरोबरच डस्टबिनमध्ये अल्ट्रासॉनिक सेंसर, सर्वो मोटो, बझर आणि एलसीडीदेखील लावला गेला आहे.

केवळ 12 वर्षांचा असलेला मोहम्मद हसन 8 वीमध्ये शिकतो आणि तो ग्रॅजुएशन आणि पीजी करत असलेल्या सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक इंजीनियरिंगच्या स्टुडंट्सला शिकवतो. केवळ दोन दिवसांत त्याने हे स्मार्ट डस्टबिन तयार केले आहे. हसनचे म्हणणे आहे की, जर स्वच्छ भारत अभियानामध्ये टेक्निकदेखील सामील केली गेली, तर देश स्वच्छ करणे सोपे होईल. सर्व्हिंग रोबोटदेखील हसनने यापूर्वी बनवला आहे. जो त्याने केवळ 15 दिवसांत तयार केला होता. या रोबोटला कमांड देऊन काम करून घेतले जाऊ शकते.

Leave a Comment