आई होणाऱ्या राखी सावंतला सोफिया हयातने दिल्या शुभेच्छा


गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियात तिचे ब्राइडल लूकमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर तिने गुपचूप लग्न केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर तिने सोशल मीडियात तिच्या हनिमूनचेही फोटो पोस्ट केले. पण तिने शेअर केलेल्या फोटोत कुठेही तिच्या नवऱ्याची एखादी झलक देखील पाहायला मिळाली नाही. सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमे माझ्या पतीला फार आवडत नाहीत म्हणून तो या सर्वांपासून लांब असल्याचे स्पष्टीकरण तिने दिले होते. त्यात आता आणखी भर म्हणजे राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे ती गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


एक आई बाळासह राखीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये दिसून येत आहे. राखी गरोदर असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी हा फोटो पाहून बांधला. तिला अनेकांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच राखीची मैत्रीण आणि ब्रिटीश अभिनेत्री सोफिया हयात हिनेसुद्धा राखीसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ती राखीला या व्हिडीओमध्ये शुभेच्छा देताना दिसत आहे.


लग्नाच्या राखी तुला खूप खूप शुभेच्छा. मला असे कळले आहे की तू लवकरच पतीला भेटायला लंडनला येणार आहेस. त्याचसोबत तुझ्याकडे एक आनंदाची बातमीसुद्धा आहे असे मला समजले आहे. लवकरच मी मावशी होणार आहे आणि तुझ्यासाठी मी फार खूश असल्याचे या व्हिडीओत म्हणताना ती दिसत आहे. आता तिच्या या गरोदरपणाच्या चर्चा कितपर्यंत खऱ्या आहेत खोट्या यावर राखीच स्पष्टीकरण देऊ शकते.

Leave a Comment