पुढील ईदला रिलीज होणार नाही सलमानचा कोणताही चित्रपट


‘ईद’चा मुहूर्तसाधून बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान हा मागील अनेक वर्षापासून आपले चित्रपट रिलीज करत आला आहे. सलमानच्या चित्रपटांसाठी ‘ईद’च्या दिवशीचा मुहूर्त हा ठरलेला असतो त्यामूळे इतर अभिनेत्यांचे चित्रपट या दिवशी रिलीज होत नाहीत. पण भाईजान पुढच्या वर्षीची ‘ईद’ ही चित्रपटाशिवायच साजरी होणार असल्याचे दिसत आहे. खुद्द सलमान खाननेच याचा खुलासा केला आहे.

पुढच्या वर्षी ‘ईद’च्या दिवशी सलमान खान आणि आलिया भट्ट यांची जोडी असलेला ‘ईन्शाल्ला’ हा चित्रपट रिलीज होणार होता. सलमान खान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत पुन्हा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत असल्यामुळेच हा चित्रपट त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. पण हा चित्रपट ईदच्या दिवशी रिलीज होणार नसल्याचे सलमान खानने सांगितले आहे.


याबाबतची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी देखील ट्विटरवरुन दिली आहे. आत्तापर्यंत ईदच्या दिवशी सलमान खानच्या रिलीज झालेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. पण हा निर्णय त्याने अचानक का घेतला, याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. आता ‘ईन्शाल्ला’ चित्रपटासाठी दुसरा कोणता मुहूर्त ठरवण्यात येतो, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Leave a Comment