महादेव जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार संजय दत्त


बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात अभिनेता संजय दत्त याची लवकरच राजकारणात एन्ट्री होणार असून संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्र सरकारमधील मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे. त्यांनी याबद्दलची माहिती मुंबईत आयोजित पक्षाच्या महामेळाव्यात दिली.

यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, संजय दत्तचा २५ सप्टेंबर रोजी ‘रासप’ मध्ये प्रवेश होणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. संजय दत्त यांच्यासारखी माणसे आम्ही कव्हर करायला लागलो आहोत. फिल्म लाईनमध्ये देखील आम्ही बांधणी केली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान संजय दत्तने देखील एक व्हिडिओ शेअर करुन रासपच्या वर्धापनदिनानिमित्त महादेव जानकरांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment