ऑपरेशनवेळी डॉक्टर का परिधान करतात विशिष्ट रंगाचे कपडे ?


डॉक्टरांना तुम्ही कधी ऑपरेशन करताना पाहिले आहे का? असा प्रश्न जर आम्ही तुम्हाला विचारला तर त्याचे उत्तर नाहीच असणार आहे. कारण ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर आणि नर्सेसशिवाय कोणालाही प्रवेश नसतो. पण यादरम्यान विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट असते ती डॉक्टरांचा पोशाख… तुम्ही चित्रपटात किंवा एखाद्या हॉस्पीटलमध्ये ऑपरेशन करताना डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या कपड्यात दिसतात. पण फक्त या दोनच रंगाचे कपडे का घातले जातात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आज आम्ही तुम्हाला याच विशिष्ट रंगाच्या कपड्यांबाबत सांगणार आहोत.

पूर्वीच्या काळी एखाद्या हॉस्पीटलमधील डॉक्टर आणि सर्वच कर्मचारी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत असत. पण एका प्रभावशाली डॉक्टरांनी या पारंपारिक पांढऱ्या रंगाच्या ड्रेसला १९१४ मध्ये हिरव्या रंगात बदलले. तेव्हापासूनच हे हिरव्या कपडे परिधान करण्याचा रिवाज सुरु झाला. पण, त्यातच काही डॉक्टर निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात.

तुम्ही जर हॉस्पीटलमध्ये कधी बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की हॉस्पिटलच्या पडद्यांनाही हिरवा किंवा निळा रंग असतो. त्यासोबतच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे कपडे आणि मास्कही हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असता. पण प्रश्न हा उपस्थित होतो की, असे काय या हिरव्या आणि निळ्या रंगात खास आहे? जे इतर रंगांमध्ये नाही.

यासंदर्भात टुडे सर्जिकल नर्सच्या १९९८ च्या अंकात प्रकाशित झालेल्या अहवाला, डॉक्टरांनी सर्जरीवेळी हिरव्या रंगाचे कपडणे वापरणे सुरू केले, कारण या रंगाने डोळ्यांना आराम मिळतो. असे अनेकदा होते की, आपण जेव्हा एखाद्या रंगाकडे एकसारखे बघतो तेव्हा डोळ्यांना एक वेगळाच थकवा जाणवू लागतो. तसेच कोणत्याही चमकदार वस्तूला पाहून डोळे चमकतात. पण आपण लगेच जेव्हा हिरव्या रंगाकडे बघतो तेव्हा डोळ्यांना आराम मिळतो.

आता वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघायचे झाल्यास आपल्या डोळ्यांची निर्मिती अशी झाली की, ते मुख्यता लाल, हिरवा आणि निळा रंग बघण्यात सक्षम आहेत. मनुष्यांचे डोळे या रंगांच्या मिश्रणाने तयार झालेले इतर कोट्यवधी रंग ओळखू शकतात. पण आपले डोळे या सर्वच रंगांच्या तुलनेत हिरवा किंवा निळा रंगच अधिक चांगल्याप्रकारे बघू शकतात.

हिरवा आणि निळा रंग आपल्या डोळ्यांना तेवढाच आकर्षक वाटतो, तेवढेच लाल आणि पिवळे वाटतात. हेच कारण आहे की, डोळ्यांसाठी हिरवा आणि निळा रंग चांगला मानला जातो आणि हॉस्पिटलमध्ये पडद्यांपासून ते कर्मचाऱ्यांच्या कपड्यांपर्यंत रंग हिरवा किंवा निळा याच कारणामुळे असतो. जेणेकरून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांना आणि तिथे राहणाऱ्या रूग्णांच्या डोळ्यांना आराम मिळावा.

ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या रंगाचे कपडे घालतात कारण सतत रक्त आणि मानवी शरीराच्या आतील अंग बघून ते मानसिक दबावात येऊ शकतात. अशात त्यांचा हिरवा रंग बघून तणाव दूर होतो. ते कधी कधी निळ्या रंगाच्या कपड्यांमध्येही असतात. आपल्या मेंदूवर निळा रंगही हिरव्या रंगाप्रमाणे प्रभाव टाकतो.

Leave a Comment