गुगलने बदलली आपली ती परंपरा


Android Q या नव्या व्हर्जनचे नाव बदलुन Android 10 असे ठेवण्याचा निर्णय गुगलच्या लोकप्रिय अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टिमने घेतला असल्यामुळे गुगलच्या 10 वर्षाच्या ‘मिठाई’च्या नावाने अँड्रॉइड व्हर्जनची नावे ठेवण्याच्या परंपरेला ब्रेक लागला आहे. कपकेक, लॉलीपॉप, इक्लेअर अशी नावे गुगलच्या आजपर्यंतच्या ऑपरेटिंग सिस्टिमला देण्यात आली आहेत.

गुगलकडून गेल्या 10 वर्षाच्या या परंपरेला ब्रेक देण्यात आला आहे. गुगलकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाव देण्याच्या पद्धतीत बदल करण्यात येत असल्याची माहिती गुगलच्या अधिकृत ब्लॉगमध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर अँड्रॉइडचा लोगो देखील बदलण्यात आला असून गुगल येत्या काही दिवसात नव्या लोगोसह अँड्रॉइड 10 चे अपडेट आपल्या युजर्ससाठी उपलब्ध करुन देणार आहे.

अँड्रॉइडच्या वेगवेगळ्या व्हर्जनला देण्यात आलेली नावे देखील लोकप्रिय आहेत. दरवर्षी रिलीज करण्यात येणाऱ्या अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनचे नाव कोणत्या गोड पदार्थाचे नाव असेल याचे अंदाज आतापर्यंत बांधले जात होते. पण ही नावे स्पष्ट आणि प्रत्येकाला लवकर समजावी यासाठी गुगलने आता आकड्यांच्या आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment