भाजप प्रवेशाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांची सावध प्रतिक्रिया


सातारा : भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आपण विकासकामांसाठी घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आपल्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली असेल तर ती चांगलीच असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनीच साताऱ्याचा विकास केला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केवळ आडवाआडवीच केल्याचा टोला, त्यांनी स्वपक्षीयातील विरोधकांना लगावला आहे. त्यांनी यावेळी रामराजे निंबाळकर आणि शिवेंद्रराजे भोसले यांचीही खिल्ली उडवली.

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली होती. उदयनराजेंचे बंधू आमदार शिवेंद्रराजे यांनी याआधी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये शिवेंद्रराजे गेल्यामुळे उदयनराजे अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे बोलले जात होते.

Leave a Comment