या महिलेच्या गळाला लागला चक्क दुतोंडी मासा


तलावात मासे पकडण्यासाठी गेले असता न्यूयॉर्कमधील एका जोडप्याच्या गळाला जे लागले ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्या जोडप्याच्या गळाला चक्क दोन तोंडांचा मासा लागला. त्यांनाही हा मासा पाहताच आश्चर्याचा धक्का बसला. याबाबत एका वर्तमानपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार, हा मासा डेबी गेडेस हिने पकडला असून सध्या सोशल मिडियावर या माश्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या तलावाचे नाव चॅम्प्लेन लेक असे असून हा मासा पकडताच डेबी गेडेसने त्याचे त्वरित फोटो काढून त्याला पाण्यात सोडून दिले.

आपल्या पतीसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी डेबी गेडेस चॅम्प्लेन लेकजवळ गेली होती. तिथे मासे पकडत असताना तिला हा दोन तोंडांचा मासा सापडला. डेबी सांगते की, हा मासा जेव्हा आम्ही पकडला तेव्हा आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसेनासा झाला की हा 2 तोंडांचा मासा असूनही खूप स्वस्थ आणि छान आहे.

माश्याचे हे फोटो नॉटी बायज फिशिंगने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. हे फोटो अपलोड करत नॉटी बॉयज यांनी लिहिले होते की, काही दिवसांपूर्वी आमची सहकारी डेबी गेडेस यांनी चॅम्प्लेन येथून दोन तोंडाच्या मासा पकडला होता. हे फोटो Knotty Boys Fishing ने सोशल मिडियावर शेअर केल्यानंतर आतापर्यंत 6,000 पेक्षा जास्त लोकांनी हे फोटो शेअर केले असून 1000 च्यावर यावर कमेंट्स आले आहेत.

Leave a Comment