व्हिडीओकॉनने आणली फक्त 399 रु. मध्ये D2H Magic Stick


ट्रायच्या नव्या नियमांची फेब्रुवारीमध्ये डीटीएच मार्केटसाठीची अंमलबजावणी झाल्यापासून, स्वस्त मनोरंजन बिलांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा (OTT Platforms) मार्ग बऱ्याच टीव्ही दर्शकांनी निवडला. यामुळेच लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सदस्यता वाढली आहे. फोन आणि टॅब्लेटवर अ‍ॅप म्हणून यापैकी बहुतेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. अनेक डीटीएच ऑपरेटर आता यातून मार्ग काढण्यासाठी या सेवा स्वतःमार्फत ग्राहकांपर्यंत विविध प्रकारे पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, डी2एच (D2H) ही सेवा यासाठी सध्या मार्केटमध्ये दाखल झाले आहे.

आता नवीन पोर्टेबल डिव्हाइस (Portable Device) डी2एच ऑपरेटर घेऊन आला आहे, ग्राहक ज्याद्वारे काही लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहू शकतील. डी2एच मॅजिक स्टिक (D2H Magic Stick) असे या डिव्हाइसला म्हटले जाते. डी2एच सेट-टॉप बॉक्सद्वारे ऑनलाइन कंटेंट पाहण्यासाठी यूएसबी डोंगलसारखा याचा उपयोग केला जाऊ शकतो. सध्या डी2एचच्या या डिव्हाइसची प्रारंभिक किंमत ही फक्त 399 रुपये एवढी आहे. पण हा डिव्हाइस नंतर 999 रुपयांच्या किंमतीवर उपलब्ध होईल.

अमेझॉन फायर स्टिक आणि टाटा स्काय बिन्जेसारखेच डी2एच मॅजिक स्टिक आहे. केवळ डीएच-एचडी सेट-टॉप बॉक्सवरच हे कार्य करेल. ग्राहक ही स्टिक सुरुवातीचे तीन महिने मोफत वापरू शकतील. त्यानंतर त्यांना सदस्यता शुल्क म्हणून दरमहा 25 रुपये द्यावे लागतील. हे डिव्हाइस सोनी लाईव्ह, वॉचो, झी 5, अल्ट बालाजी (ALT Balaji) आणि हंगामा प्ले हे अ‍ॅप्स यात प्रीलोड केलेले आहेत. या डिव्हाइसवर हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स सारख्या सेवा उपलब्ध नसतील. हे डिव्हाइस आरएफ रिमोट कंट्रोलरद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. तुम्हाला हे डिव्हाइस वापरण्यासाठी ते वायफायशी कनेक्ट करणे गरजेचे आहे. तर अशाप्रकारे या स्टिकद्वारे तुम्ही लाईव्ह चॅनेलसह इतर अनेक सेवांचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment