ऐवढ्या किंमतीचो हा रॉकच्या बाईलीचो वेडिंग गाऊन


आपल्यापैकी अनेकांना सगळ्याच क्षेत्रातील सेलिब्रेटींच्या आवडी-निवडी जाणून घेण्याची आवड असते. त्यात तर एखाद्या सेलिब्रेटीचे लग्न असेल तर त्याची चर्चा ही जोरदारच होणार एवढे मात्र नक्की… मग ते लग्न हॉलीवूडचे असो किंवा बॉलीवूडचे असो. काहींना आपल्या खासगी आयुष्यात प्रायव्हसी हवी असते तर, काही जण खासगी आयुष्य सगळ्यांशी शेअर करतात.

हॉलिवूड स्टार आणि फायटर ड्वेन जॉन्सन अर्थात द रॉकने नुकतेच दुसरे लग्न केले आहे हे तर तुम्हाला माहितच आहे. पण त्याच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मिळाली. पण, आता वेगळ्याच कारणामुळे हे लग्न चर्चेत आले आहे. रॉकची गर्ल्डफ्रेंड लॉरेन हशियन हिने या लग्नात जो गाऊन घातला आहे त्याची किंमत तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. भारतात तिच्या गाऊनच्या किमतीत एखादी कार खरेदी करता येऊ शकते तर, काहींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च भागू शकतो. सध्या सोशल मीडियावर रॉकच्या बिच वेडिंगचा फोटोही व्हायरल होताना दिसत आहे. लॉरेनचा त्यातील वेडिंग गाऊन विशेष चर्चेत आहे.

आपला दुसरा विवाह रॉकने अगदी खासगी आणि मोजक्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत केला. सध्या सोशल मीडियावर एका बिचवर झालेल्या या सोहळ्यातील मोजकेच फोटो दिसत आहेत. हा विवाह सोहळा १८ ऑगस्टला संपन्न झाला. त्यांच्या फोटोंमध्ये नव दाम्पत्य खूपच स्टायलिश दिसत आहे. रॉक व्हाईट शर्ट आणि ट्राउजर्समध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे तर, लॉरेनचा वेडिंग गाऊन लक्षवेधी ठरत आहे. लॉरेनने मीरा झ्विल्लिंगरचा व्हाईट स्लिवलेस गाऊन घातला आहे. फुलांची एम्ब्रॉयडरी त्यावर करण्यात आली आहे. एक डीप नेक गाऊन तो होता. त्याच्या पाठीवरही सेम डिटेलिंग करण्यात आली आहे. तो गाऊन कमरेपासून फिडेट आहे. वेडिंगसाठीच डिझाइन केलेल्या या गाऊनची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाऊनची किंमत १२ हजार ५० डॉलर होती. म्हणजेच भारतीय रुपयांत याची किंमत ८ लाख ६२ हजार ४०० रुपये होत आहे.

२००७पासून रॉक आणि लॉरेन एकमेकांना डेट करत होते. जॅस्मिन (३ वर्षे) आणि टायना (१६ महिने) अशा दोन मुलीही त्यांना आहेत. लग्न करण्याची दोघांनी नुकतीच घोषणा केली होती. रॉकचे हे दुसरे लग्न असून, त्याचे लग्न १९९७मध्ये डॅनी ग्रासियासोबत झाले होते. कॉलेज जीवनापासून डॅनी आणि रॉक मित्र होते. पण, दहा वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर रॉकच्या आयुष्यात लॉरेन आली. दोन मुलींना जन्म दिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे डॅनी आणि रॉक यांनाही एक मुलगी आहे.

Leave a Comment