Asteroid म्हणजे नेमके काय रे भाऊ !


पृथ्वीच्या कक्षेत अंतराळात असलेला Asteroid (एस्टेरॉयड) नावाचा महाकाय दगड येण्याचा धोका निर्माण झाल्याचे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. एस्टेरॉयड बाबत अंतराळ संशोधक आणि वैज्ञानिकही चिंतीत आहेत. नासा संशोधकांनीही एस्टेरॉयड नासाच्या उपग्रहाच्या अगदी जवळून जाणार असल्याने हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. पृथ्वीच्या कक्षेत हा दगड आल्यास पृथ्वीवर तो आदळू शकतो. असे घडल्यास पृथ्वीवर मोठे संकट निर्माण होऊन तिचा सर्वनाश होण्याचा धोका वर्तवला जात असल्यामुळे एस्टेरॉयडपासून पृथ्वीचा बचाव कसा करायचा याबाबत अमेरिकेतील अंतराळ संशोधक संस्था नासा विचार करत आहे.

असे सांगितले जात आहे की, पृथ्वीसाठी एस्टेरॉयड हा अत्यंत घातक आहे. एक ट्विट करुन टेस्ला आणि स्पेसएक्स संस्थापक एलोन मस्क यांनी इशारा दिला आहे की, आपल्या पृथ्वीच्या दिशेने ‘God of Chaos’ येत आहे. काही धोका त्यातून निर्माण झाल्यास त्याचा प्रतिकार करण्यासाठी तसेच, त्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याकडे कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. दरम्यान, अंतराळात वैज्ञानिकांनीही छोटे छोटे एस्टेरॉयड हजारो मैल दूर अंतरावर अंतरावर उडताना पाहिले आहेत.

वैज्ञानिकांनी पृथ्वीसाठी अत्यंत धोकादायक ठरु पाहणाऱ्या एस्टेरॉयडला Potentially Hazardous Asteroid-PHA श्रेणीत ठेवले आहे. 340 मीटर इतका मोठा Asteroid 99942 Apophis पृथ्वीच्या कक्षेच्या अगदीच जवळ 19,000 मैल अंतरावरुन मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. पण जर त्याने मार्ग बदलला आणि तो पृथ्वीवर आदळला तर प्रचंड मोठी हानी होऊ शकते. भूकंप आणि त्सुनामी यांसारख्या घटना असे घडल्यास घडू शकतात. काही ठिकाणी ज्वालामुखी होण्याचाही संभव आहे. ज्यामुळे संपूर्ण मानवी प्रजातच संपू शकते.

इजिप्तमधील एका देवतेच्या नावावरुन God of Chaos हा शब्द घेण्यात आला आहे. God of Chaos याचा ‘अराजकतेची देवता’ असा अर्थ होतो. पृथ्वीच्या जी अगदी जवळ आहे. नासाने एस्टेरॉयडला 99942 एपोफिस असे नाव दिले आहे. सांगितले जात आहे की, 99942 एपोफिस हा तब्बल 340 मीटर लांबीचा असून हा दगड नासाने टीपलेल्या छायाचित्रांमध्ये गोलाकार दिसतो. जर तो पृथ्वीवर आदळला तर सर्वनाश संभव आहे. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट होऊ शकले नाही की, 340 मीटर लांबीचा हा एस्टेरॉयड पृथ्वीसह अंतराळातील आणखी कोणत्या ग्रहावर किती परिणाम करेल. पण, नासाने दावा केला आहे की, तो पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर परिणाम होऊ शकतो.

असाही दावा नासाने केला आहे की, उघड्या डोळ्यांनीही God of Chaos एस्टेरॉयड पाहता येऊ शकतो. एका अशा किरणांच्या रुपात हा अवकाशात दिसेल की, जी किरणे अत्यंत वेगवान आणि अधिक प्रकाशमान होत जातील. या घटनेचा International Asteroid Research Community ने खगोलशास्त्रीय पद्धतीने निरिक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, काही धोका निर्माण झाल्यास त्याचा निपटारा कसा करायचा यावरही विचार करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment