ज्या सीबीआय मुख्यालयाचे उद्घाटन केले तेथेच चिदंबरम यांना काढावी लागली रात्र


सीबीआयने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात बुधवारी रात्री अटक केले. सीबीआय अधिकाऱ्यांना त्यांना सीबीआयच्या मुख्यालयात घेऊन गेले. आठ वर्षांपुर्वी सीबीआयच्या याच मुख्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री होते. या मुख्यालयाचे उद्घाटन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते झाले होते. सोशल मीडियावर त्या उद्घाटन समारंभाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.


बुधवारी अटक होण्याआधी चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात मीडियाला संबोधित केले होते. त्यानंतर ते आपल्या घरी परतले. अखेर नाट्यमय घडामोडीनंतर बुधवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली होती.

मीडियाला संबोधित करताना पी चिदंबरम यांनी कायद्यापासून पळून जात नाहीये तसेच त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेस नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद आणि अभिषेक मनू सिंघवी उपस्थित होते.

या सर्व प्रकरणावर चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांने ट्विट केले की, एजेंसीद्वारा करण्यात येणारा हा तमाशा केवळ सनसनी परवण्यासाठी आणि काही लोकांच्या फायद्यासाठी करण्यात येत आहे.

Leave a Comment