सोशल मीडियात का बरे होत आहे परिणीतीच्या या फोटोची चर्चा


लवकरच ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात येणार असून अभिनेत्री परिणीती चोप्रा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटातील परिणीताचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शेअर केला आहे.

परिणीती रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये पहिल्यांदाच वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे. परिणीती या पोस्टरमध्ये एक बाथटबमध्ये बसली असून मोठी जखम तिच्या कपाळावर आहे आणि या जखमेतून रक्त वाहत असल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच एखादे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न ती करत असल्याचे जाणवत आहे.


‘द गर्ल ऑन द ट्रेन’च्या रिमेकमध्ये परिणीती एका घटस्फोटीत महिलेची भूमिका साकारत असून एका बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या शोध ती या चित्रपटामध्ये घेणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसापूर्वीच लंडनमध्ये सुरु करण्यात आले आहे. परिणीतीव्यतिरिक्त चित्रपटामध्ये आदिती राव हैदरी, किर्ती कुल्हारी आणि अविनाश तिवारी स्क्रीन शेअर करणार आहेत. तर रिलायन्स एन्टरटेमेंटअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. पण या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment