भारताच्या पदरी पडला आणखी एक पाकिस्तानी जावई


काल भारतीय नागरिक असलेल्या शामियासोबत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली विवाह बंधनात अडकला आहे. आता शोएब मलिकनंतर हसनही भारताचा जावई झाला असून सध्या एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर म्हणून हरियाणाच्या नूंह भागात राहणारी शामिया आरझू काम करते.

दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये मंगळवारी २० ऑगस्ट रोजी हसन अली आणि शामिया आरझू यांचा विवाहसोहळा पार पडला. हा विवाहसोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

शामिया आणि हसन अलीचे लग्न शामियाच्या पंजोबांनी ठरवले. दोघांची भेट गेल्यावर्षी झाली होती. दोघांमध्ये तेव्हापासून प्रेमसंबंध सुरू झाले होते. पाकिस्तानकडून हसन अलीने नऊ कसोटी सामन्यात ३१ बळी मिळवले आहेत. तर ५३ एकदिवसीय सामन्यात ८२ बळी घेतले आहेत. हसन हा भारतीय महिलेशी लग्न करणारा पाकिस्तानचा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी जहीर अब्बास, मोहसिन खान आणि शोएब मलिक यांनी भारतीय मुलींशी लग्न केले आहे.

Leave a Comment