लपूनछपून पॉर्न साईट पाहणाऱ्यांचा डेटा लीक!


नवी दिल्ली : सोशल मीडिया वापरत असलेला नेटकऱ्यांचा खासगी डेटा लीक झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या किंवा पाहिल्या देखील असतील. या समस्येचे निदान काढण्यात फेसबूक, गुगलसह अन्य कंपन्यांना अपयशी ठरलेल्या असतानाच आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका मोठ्या पॉर्न साईटचा डेटा लीक झाला आहे.

युझरची सर्व खासगी माहिती यामध्ये देण्यात आली असून नुकतीच दी नेक्स्ट वेबनुसार पॉर्न साइट Luscious मध्ये एक मोठी गडबड झाली आहे. युजरची ओळख लपवून त्यांना पॉर्न फोटो आणि अॅनिमेशन अपलोड करण्याची सुविधा ही साईट देते. vpnMentor च्या शोधकर्त्यांनी या पॉर्न साईटमधील या कमतरतेचा शोध लावला आहे. या साईटवर हे शोधकर्ते अॅडल्ट माहिती अपलोड करणारे आणि ते पाहणाऱ्यांची खासगी माहिती मिळविण्यात यशस्वी ठरले. युजरचे इमेल्स, लिंग, देश, त्यांची आवड आदी गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर त्या वेबसाईटवर जे काही कमेंट, लाईक, शेअर केले ते ही त्यांनी मिळविले आहे. हा घोळ ही सर्व माहिती एन्क्रीप्टेड नसल्याने झाला आहे.

या माहितीचा शोध लावणाऱ्या संस्थेने सांगितले की, आमच्या हाती ही माहिती लागल्याने सुरक्षित आहे. पण अन्य कोणत्या हॅकरच्या हाती ही माहिती जर लागली तर या माहितीचा उपयोग तो फसवणूक, फिशिंग, डॉक्सिंह सारख्या प्रकारासाठी करू शकतो. तसेच युजरला ब्लॅकमेलही केले जाऊ शकते. काही ईमेल आयडी म्हणजे त्या युजरचे पूर्ण नावच आहे.

याबाबत Luscious ला माहिती मिळाल्यावर ही कमतरता दूर करण्यात आली आहे. पण, याबाबत वेबसाईट चालविणाऱ्यांनी काही माहिती दिलेली नाही. या साईटवर असलेल्या ईमेल पैकी 20 टक्के ईमेल खोटे असल्याचा अंदाज असल्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment