‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत कंडोमच्या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारला असता वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्याची कबुली अभिनेता रणवीर सिंहने दिली आहे. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी १२ वर्षांचा असताना मी केवळ उत्सुकतेपोटी शरीरसंबंध ठेवल्याचे तो म्हणाला.
माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी ठेवले होते शरीरसंबंध
माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मी खूप कमी वयात केली. काळाच्या पुढे मी होतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. शाळेत असताना माझ्या मित्रांचे आईवडील मला म्हणायचे की, आमच्या मुलांना तू बिघडवत आहेस. सेक्सविषयी माझ्या वयाच्या मुलांना फार काही माहीत नसल्यामुळे यात मी खूप एक्स्पर्ट झालो असे मला वाटायला लागले असल्याचे रणवीरने सांगितले.
या मुलाखतीत कंडोमची जाहिरात करण्यामागचे कारणदेखील रणवीरने सांगितले. तो म्हणाला, एकदा कारमध्ये मी बसलो होतो. त्यावेळी समोर असलेल्या होर्डिंगवरील विविध जाहिराती पाहत होतो. त्यावर विविध विक्रीच्या वस्तू दिसल्या पण कंडोमची जाहिरात कुठेच नव्हती. मला मग समजले की कंडोमच्या ज्या जाहिराती आपल्याकडे आहेत त्या अत्यंत प्रक्षोभक आहेत. सेक्सची फक्त हीच एक संकल्पना होऊ शकत नाही. पण या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन आता समाजाचा बदलत असल्यामुळे याविषयी आता मोकळेपणाने आपण बोलू शकतो.