बोल्ड फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत आली सलमानची ही अभिनेत्री


मागील काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या रायची ‘कर्बन कॉपी’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल खूप चर्चेत आहे. कारण स्नेहाने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.


मागील बऱ्याच वर्षांपासून स्नेहा सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच आपले हॉट फोटो शेअर करत असते. स्नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकत्याच केलेल्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.


स्नेहाला 2005 मध्ये सलमान खानने बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. स्नेहाने ‘लकी- नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटातून सलमानसोबत डेब्यू केला होता. पण स्नेहा यानंतर बॉलिवूडमध्ये फार फार काळ टिकू शकली नाही.


स्नेहा काही दिवसांपूर्वी तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती, ऑल इंडिया मिक्स्ड मार्टिकल आर्ट्स असोसिएशनचा चेअरमन अवी मित्तल व स्नेहा दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांनीही नुकतेच आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला.


स्नेहा बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर तमिळ आणि कन्नड चित्रपटांकडे वळली. पण ती अचानक मागच्या चार वर्षांपासून सिनेसृष्टीतून गायब झाली. कारण स्नेहाला याकाळात एका आजाराने ग्रासले होते. ऑटोइम्यून डिसऑर्डरनेने स्नेहा पीडित होती.

Leave a Comment