कर्नाटकाच्या आमदाराने मंत्रीपदाऐवजी चक्क घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ


बंगळुरु – मागील काही दिवसांपूर्वी कर्नाटकात घडलेल्या राजकीय नाट्यानंतर जनता दल आणि काँग्रेस प्रणित कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले व मुख्यमंत्रीपदी येडियुरप्पा पुन्हा विराजमान झाले. २६ जुलै रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली होती. तर विधानसभेत २९ जुलै रोजी सरकारचे बहुमत सिद्ध केल्यानंतर येडियुरप्पा यांनी मंगळवारी मंत्रिमडळाचा पहिला विस्तार केला. १७ आमदारांनी ज्यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एका आमदाराने मंत्रीमंडळाच्या विस्तारावेळी मंत्रीपदाऐवजी चुकून चक्क मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी हा सर्व प्रकार पाहून स्मिथ हास्य केले.

मंगळवारी आमदार मधू स्वामी मंत्रीपदाची शपथ घेतेवेळी चुकून मुख्यमंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली. त्यांना वेळीच चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी स्मिथ हास्य करत आपली चूक दुरूस्त केली. मुख्यमंत्री येडियुरप्पा या प्रकारावेळी उपस्थित होते. येडियुरप्पा यांनी स्मिथ हास्य करत मधू स्वामी यांची गळाभेट घेतली.

राजभवनात मंगळवारी राज्यपाल वजूभाई वाला यांनी १७ नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्यासह के.एस.ईश्वरप्पा व आर.अशोक हे दोन माजी उपमुख्यमंत्री, अपक्ष आमदार एच.नागेश आणि लक्ष्मण सावदी, श्रीनिवास पुजारी यांचा मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. यांच्याशिवाय गोविंद एम. करजोल, अश्वथ नारायण सी. एन, बी. श्रीरामुलु, एस. सुरेश कुमार, वी. सोमन्ना, सी. टी. रवि, बासवराज बोम्मई, जे. सी. मधु स्वामी, सी. सी. पाटील, प्रभु चौहान आणि शशिकला जोले अण्णासाहेब यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

Leave a Comment