
नवी दिल्ली : मासिक पाळीदरम्यान देशभरातील शहरासह खेडेगावातील लाखो महिला सॅनिटरी पॅडचा वापर करतात. पर्यावरणला सॅनिटरी पॅडमुळे हानी पोहोचत असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला गेला होता. पण आता यावर दिल्लीच्या आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांनी उपाय शोधून काढला आहे. केळ्याच्या तंतूपासून आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी सॅनिटरी पॅड तयार केले आहे. या सॅनिटरी पॅडमुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही याची काळजी विशेष काळजी घेण्यात आली आहे.
दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड
तुम्ही 120 वेळा म्हणजे तब्बल 2 वर्षे केळ्याच्या तंतूपासून बनवण्यात आलेले हे सॅनिटरी पॅड धुवून वापरु शकता. तसेच या पॅडचा वापर केल्याने स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही. 100 रुपये या सॅनिटरी पॅडची किंमत आहे.
हे सॅनिटरी पॅड दिल्लीच्या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या अर्चित अग्रवाल आणि हैरी सहरावत या दोन विद्यार्थ्यांनी विविध शिक्षकांच्या मदतीने तयार केले आहे. बी टेकच्या चौथ्या हे दोघेही वर्षात शिकत आहेत. साफे नावाची एक स्टार्टअप कंपनी या दोघांनी मिळून सुरु केली आहे. त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून हे सॅनिटरी पॅड तयार केले आहे.

त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत बोलताना आयआयटीच्या डिझाईन विभागाचे सहाय्यक शिक्षक श्रीनिवास वेंकटरमन म्हणाले, स्वास्थ्य आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टींचा विचार केला. तर ही युक्ती फार फायदेशीर ठरणार आहे. जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च हे सॅनिटर पॅड बनवण्यासाठी आला आहे. तसेच आम्ही याचे पेटेंटही केले आहे.
अर्चित अग्रवाल आणि हैरी सहरावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार स्तर या सॅनिटरी पॅडमध्ये असून हे सॅनिटरी पॅड पॉलिएस्टर पिलिंग, केळ्याचे तंतू, कॉटन पॉलियूरेथेन लेमिनेट याचा वापर करुन तयार केले आहे. केळे खाल्ल्यानंतर आपण त्याची साल फेकून देतो. पण त्यात फायबर असते. आम्ही याचाच वापर करत या केळ्याच्या साली मशीनमध्ये टाकून सुकवल्या. यातील फायबरवर ओलसरपणा शोषून घेणारा एक पॉलिएस्टर पिलिंग म्हणजे एक कपडा टाकला. तसेच लीकेज थांबण्यासाठी कॉटन पॉलियूरेथेन लेमिनट (हॉस्पिटलमध्ये प्रयोगद्वारे वापरण्यात येणारे एक केमिकल) वापरण्यात आले आणि याचाच वापर करुन सॅनिटरी पॅडला कवर देण्यात आले.

प्लास्टिक आणि सिंथेटीकद्वारे सध्या बाजारात उपलब्ध असणारे सॅनिटरी पॅड हे बनवलेले असते. पर्यावरणाला त्यामुळे हानी पोहोचते. सॅनिटरी पॅड वापरल्यानंतर स्त्रिया ते फेकून देतात. त्यामुळे ते नष्ट होण्यास 50 ते 60 वर्ष लागतात. तसेच नाल्यात किंवा समुद्रात फेकल्याने त्याचे अनेक दुष्परिणामही होतात. विशेष म्हणजे बाजारात वापरलेले सॅनिटरी पॅड जाळल्यानंतर त्यातून रासायनिक धूर बाहेर पडतो. ज्यामुळे वायू प्रदूषण होते. देशभरात जवळपास 336 मिलियन महिलांमध्ये 36 टक्के म्हणजेच 121 मिलियन महिला डिस्पोजेबल सॅनिटरी पॅडचा वापर करतात.
दरम्यान ऑनलाईन ई-कॉर्मस वेबसाईटवर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले सॅनिटरी पॅड हे उपलब्ध आहेत. यातील एका पॅकेटमध्ये दोन सॅनिटरी पॅड आहेत. ज्याची किंमत 199 रुपये आहे. याचा वापर केल्यानंतर तुम्ही ते थंड पाण्यात धुवून दोन वर्षापर्यंत वापरु शकता.
