या तारखेला रिलीज होणार ‘दबंग ३’


गेल्या काही दिवसांपासून आपल्या ‘दबंग ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान व्यस्त आहे. या चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ भाईजान अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतो. सलमान खान या चित्रपटात ‘चुलबुल पांडे’ ही भूमिका साकारत आहे. प्रेक्षकांना ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ दोन्ही चित्रपटातील ‘चुलबुल पांडे’ भावला असल्यामुळेच हाच चुलबुल पांडे ‘दबंग ३’ मधुनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


‘दबंग ३’च्या प्रदर्शनाची तारीख सलमान खानने जाहिर केली आहे. याच वर्षी २० डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. याबाबतची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही सोशल मीडियावर शेअर केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या राजस्थानमध्ये सुरू आहे. आत्तापर्यंत चित्रपटाच्या सेटवरुन बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. तसेच, काही लूक देखील लिक झाले असल्यामुळे चुलबुल पांडे आणि रज्जोला भेटण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Leave a Comment